Sagar Dolttade

VKSP logo

सर्वसामांन्यातील एक असामान्य व्यक्तिमत्व

राष्ट्रीय अध्यक्ष, विशेष समाज कल्याण परिषद

संस्थापक, हिंदुस्थान बुक ऑफ टॅलेंट

माझे ध्येय

सचोटी, प्रभावी प्रतिनिधित्व, उत्तरदायित्व आणि परिणाम

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, आणि महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांपासून प्रेरणा घेऊन, आणि सामाजिक कार्याची मशाल हाती घेऊन, आपले राज्य, जिल्हा, तालुक्याच्या विकासास हातभार लावण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, समाजाचे ऋणानुबंध हृदयापासून जपावे, तरुणांना योग्य दिशा द्यावी, पीडितांना न्याय मिळवून द्यावा, रंजलेल्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, शासन दरबारी अडचणी मांडाव्या हि फक्त माझी नैतिक उद्धिष्ट्ये नाहीत तर माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाण बाळगून सामाजिक न्याय आणि कल्याणाप्रति २४ तास आणि ३६५ दिवस मी सदैव कार्यरत राहीन.

एक पाऊल विकास कार्याच्या दिशेने

विकास कार्याचा न संपणारा प्रवास...

आपल्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारी विकास कामे पुढे नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. समाजातील तळागाळापर्यंत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने आणि पूर्व समावेशक प्रयत्न करणे हे माझे अंतिम ध्येय आहे. प्रत्येक नागरिकाला उच्च संधी आणि सुविधा उपलब्ध करून देणे हा माझा उद्देश आहे.

स्वयंसेवक
0 +

व्याप्ती क्षेत्र

0 + जिल्हे

कार्यक्रम

0 +

मोहीम

0 +
जनताप्रेम

अभिष्टचिंतन सोहळा

श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांची श्री.सागरभैय्या दोलत्तडे सदिच्छा भेट घेताना, अनेक रंजक गोष्टींची चर्चा झाली. लोक कल्याणासाठी भविष्यात एकत्र येऊन कार्य करण्याची प्रेरणा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सागरभैय्याना दिली.
स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज (भोसले) यांची श्री.सागरभैय्या दोलत्तडे यांनी सदिच्छा भेट घेऊन आगामी योजनांची चर्चा केली तो क्षण.
कोल्हापूर दक्षिण चे आमदार श्री.ऋतुराज पाटील आणि हातकणंगले येथील खासदार श्री.धैर्यशील माने यांच्या समवेत श्री.सागरभैय्या दोलत्तडे यांनी सदिच्छा भेट घेऊन अनेक महत्वाच्या मुद्यांची चर्चा केली तो क्षण.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित केलेल्या पुणे अचिव्हर्स या कार्यक्रमात श्री.सागरभैय्या दोलत्तडे यांना पुणे अचिव्हर्स २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गॅलरी

पुरस्कार आणि मान्यता

नागरिकांकडून संदेश

प्रिया पुरोहित पुणे

मा. सागर दोलतडे जी यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये युवा सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. त्यांनी नेहमीच तरुणांना योग्य दिशा दाखवली आणि त्यांना यश मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मेहनतीला मी मनापासून सलाम करतो.

अरविंद वलेकर मुंबई

जनता दरबारच्या माध्यमातून श्री. सागर दोलतडे जी यांनी सुरू केलेल्या नव्या प्रयत्नातून आपल्या जनतेच्या समस्यांवर ज्या पद्धतीने तोडगा निघतो ते खूप प्रभावी आहे. त्यांच्यासाठी नेहमी लोकांचे गाऱ्हाणे ऐकणे आणि त्यांना मदत करणे खूप महत्वाचे आहे. त्यांची विकास कार्ये नेहमीच आम्हाला प्रेरणा देतात.

संपर्क






    सहाय्यता कक्ष

    श्री.सागरभैय्या दोलत्तडे

    आढावा
    केंद्रीय कार्यालय